जयपूर जलमय... चार जणांचा मृत्यू

गुलाबी नगरी म्हणून ओळखली जाणारी राजस्थान राजधानी जयपूर सध्या पाण्यात बुडालीय. जयपूरमध्ये पावसानं एकच हाहाकार उडवून दिलाय. यामध्ये चार लोकांचा मृत्यू झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 22, 2012, 12:14 PM IST

www.24taas.com, जयपूर
गुलाबी नगरी म्हणून ओळखली जाणारी राजस्थान राजधानी जयपूर सध्या पाण्यात बुडालीय. जयपूरमध्ये पावसानं एकच हाहाकार उडवून दिलाय. यामध्ये चार लोकांचा मृत्यू झालाय.
कोसळणाऱ्या पावसात भिंत अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू झालाय तर दोन जण पावसामुळे झालेल्या अपघातात ठार झालेत. मंगळवारी रात्री ११ वाजल्यापासून इथं पावसाची रिमझिम सुरूच आहे. त्यामुळे शहरात पूर येण्याची शक्यताही वर्तवली जातेय. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झालंय. यामुळे सरकारनं शाळांना सुट्टी जाहीर केलीय. शहरातील अनेक भाग पाण्यात बुडालेत. कच्च्या घरांची पडझड झालीय. सखल भागांत पाणी साचलंय. अनेक ठिकाणांहून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. तसंच जयपूरहून मुंबई आणि दिल्लीला जाणारा रेल्वेमार्गही काही काळासाठी बंद करण्यात आलाय.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x