कोलकाता उड्डाणपूल देवाच्या मर्जीने कोसळला : कंपनी

 पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने अजब खुलासा केलाय. देवाच्या कृपेमुळे हा ब्रिज कोसल्याचे म्हटलेय.

Updated: Apr 1, 2016, 09:36 AM IST
कोलकाता उड्डाणपूल देवाच्या मर्जीने कोसळला  : कंपनी title=

कोलकाता : बडाबाजार या अत्यंत गजबजलेल्या परिसरात बांधकाम सुरु असेलला उड्डाणपूल कोसळून १८ ठार तर ६२ जखमी झालेत. पुलाच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने अजब खुलासा केलाय. देवाच्या कृपेमुळे हा ब्रिज कोसल्याचे म्हटलेय.

आयव्हीआरसीएल या कंपनीने पुलाचे कंत्राट घेतलेले आहे. दरम्यान, पुलाच्या ढिगाऱ्यात कंपनीतील दोन कर्मचारी दबल्याची भिती व्यक्त होत आहे. गेल्या सहा वर्षांपासून या पुलाचे काम सुरु आहे. आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा पुल २०११मध्ये पूर्ण होणे आवश्यक होते. या पुलाचे एकूण खर्च १६४ कोटी रुपये आहे.

या उड्डाणपुलाचे बांधकाम हैदराबाद येथील आयव्हीआरसीएल या कंपनीकडे आहे. दुर्घटनेचे वृत्त समजताच ‘उड्डाणपूल कोसळणे हे देवाचे कृत्य असून, आम्ही असहाय्य आहोत’, अशी प्रतिक्रिया कंपनीचे अध्यक्ष पांडुरंग राव यांनी दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेवर टीकेची झोड उठली आहे. 

या प्रश्नावर भाजपने ममता बॅनर्जी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी पुल तयार करताना गडबड झाल्याचा आरोप केलाय. तसेच सीबीआय चौकशी करण्याची मागणी केलेय. राज्य सरकार पीडितग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप नक्वी यांनी केलाय.

या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुलाच्या बांधकामाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे व बांधकाम कंपनीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या घटनेवरून पश्चिम बंगालात लगेचच राजकारण सुरू झाले. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने डाव्या पक्षांच्या सरकारच्या कार्यकालात या पुलाच्या बांधकामाला परवानगी दिल्याच्या मुद्दय़ावरून डाव्या पक्षांना लक्ष्य केले.