हॅकर्सनी 'पाक वेबसाईट'वरून दिली शहीद निरंजनला श्रद्धांजली

लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांना भारतीय हॅकर्सनं अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली दिलीय. 

Updated: Jan 7, 2016, 09:12 PM IST
हॅकर्सनी 'पाक वेबसाईट'वरून दिली शहीद निरंजनला श्रद्धांजली title=

बंगळुरू : पंजाबच्या पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांना भारतीय हॅकर्सनं अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली दिलीय. 

पाकिस्तानच्या सात वेबसाईटसना हॅक करून त्यावर शहीद निरंजन यांना श्रद्धांजली दिल्याचा दावा केरळच्या 'ब्लॅक हॅटस' नावाच्या ग्रुपनं केलाय.

या वेबसाईटसाच संपूर्ण चेहरामोहराच बदलून टाकल्याचंही या ग्रुपनं म्हटलंय. 

 

 

शहीद निरंजन यांच्या दीड वर्षांच्या मुलीला आपण ही हॅकींग समर्पित करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना या हॅकर्सनं आपणं पाकिस्तानी वेबसाईटससोबत कोणत्याही चुकीच्या पद्धतीनं छेडछाड केलेली नाही.... किंवा कोणताही कंटेन्ट डिलीट केलेला नाही.

आम्ही केवळ पाक वेबसाईटवर शहीद निरंजनच्या १८ महिन्यांच्या मुलीचा एक फोटो लावलाय आणि पाकिस्तानच्या लोकांना केवळ मॅसेज देण्याच्या हेतून आम्ही हे केलंय... असं स्पष्टीकरण या हॅकर्सच्या ग्रुपनं दिलंय.