नवी दिल्ली : लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे आज सकाळी राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
संगमा हे गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ते ११व्या लोकसभेचे १९९६ ते १९९८ दरम्यान अध्यक्ष होते. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सह संस्थापक होते. १९८८ ते १९९० या कालावधीत ते मेघालयाचे मुख्यमंत्री होते.
दरम्यान, संगमा यांच्या निधनानंतर लोकसभेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
पी ए संगमा यांचा लोकसभा अध्यक्षपदाचा कार्यकाळ न विसरण्यासारखा आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली.