केजरीवालांचं उपोषण सुरूच; तब्येत ढासळली

वीज आणि पाण्याच्या बिलात झालेल्या दरवाढीविरूद्ध ‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांचं उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. परंतू डॉक्टरांच्य म्हणण्यानुसार, केजरीवाल यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. त्यामुळे त्यांना कमी बोलण्याचा सल्ला दिलाय.

Updated: Mar 27, 2013, 12:01 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
वीज आणि पाण्याच्या बिलात झालेल्या दरवाढीविरूद्ध ‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांचं उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. परंतू डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, केजरीवाल यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. त्यामुळे त्यांना कमी बोलण्याचा सल्ला दिला गेलाय.
केजरीवाल मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिलाय. ‘माझी तबेत ढासळत आहे पण माझी इच्छाशक्ती कायम आहे’ असं त्यांनी म्हटलंय.

मंगळवारी संध्याकाळी त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता त्यांच्या वजनात पाच किलोनं घट झाल्याचे निदर्शनास आलं. आत्तापर्यंत तब्बल एक लाख ८६ हजार ६९७ लोकांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांच्याविरूद्ध जाहीर झालेल्या विरोधपत्रावर सह्या केल्या आणि बिलाची रक्कम भरणार नसल्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केलाय.