अडवाणी चारित्र्यहिन नेते – आझम खान

एकीककडे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव लालकृष्ण अडवाणी यांच्या स्तुतिसुमनं उधळत आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान हे अडवाणींना ‘चरित्रहीन नेता’ म्हणून संबोधत आहेत. हे चित्र सध्या उत्तरप्रदेशात पाहायला मिळतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 26, 2013, 06:05 PM IST

अडवाणी चारित्र्यहिन नेते – आझम खान
www.24taas.com, बदायू, उत्तरप्रदेश
एकीककडे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव लालकृष्ण अडवाणी यांच्या स्तुतिसुमनं उधळत आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान हे अडवाणींना ‘चरित्रहीन नेता’ म्हणून संबोधत आहेत. हे चित्र सध्या उत्तरप्रदेशात पाहायला मिळतंय.
कन्या विद्याधन आणि त्यासारख्याच इतर सरकारी योजनेच्या लाभार्थींना चेक वाटप करण्यासाठी आयोजित केल्या गेलेल्या एका कार्यक्रमात आझम बोलत होते. यावेळी मुलायम सिंह यांनी अडवाणींच्या केलेल्या कौतुकाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आझम यांनी मुलायम सिंह यांच्या अगदी विरुद्ध अशी भूमिका मांडली. ‘अडवाणींचा बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये हात आहे. जे मोहम्मद जिना यांनना मानतात त्यांना आपण धर्मनिरपेक्ष कसं म्हणू शकतो. खरं तर अडवाणी चारित्र्यहिन नेते आहेत... कोणताही गुन्हेगार आपल्या तोंडून कधीच कबूल करत नाही की तो खूनी आहे. पण, त्याचं चारित्र्य मात्र तेच राहतं’ असं आझम यांनी म्हटलंय.
आझम खान यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, पार्टी अध्यक्षा सोनिया गांधी ज्या भागातून निवडून आल्या ते रायबरेली आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांचा मतदारसंघ अमेठी इथं ज्याप्रकारे काँग्रेसची मतं पडत आहेत. हे पाहून पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांना आपल्या खुर्च्या लवकरच सोडाव्या लागणार आहेत, असं वाटतंय, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरही तोंडसुख घेतलं.