गजेंद्र सिंग आत्महत्या : अरविंद केजरीवाल यांनी मौन सोडलं

शेतकरी गजेंद्र सिंग आत्महत्या प्रकरणी तब्बल ४३ तासांनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपलं मौन सोडलं आहे. ती घटना घडत असताना भाषण करणं चूक होती, असं म्हणत केजरीवाल यांनी माफी मागितलीय. त्याच वेळी हा विषय चघळून तुमचा टीआरपी वाढणार असेल, तर चघळत बसा, असा अनाहुत सल्लाही केजरीवालांनी मीडियाला देऊन टाकलाय.

Updated: Apr 24, 2015, 11:23 PM IST
गजेंद्र सिंग आत्महत्या : अरविंद केजरीवाल यांनी मौन सोडलं title=

नवी दिल्ली : शेतकरी गजेंद्र सिंग आत्महत्या प्रकरणी तब्बल ४३ तासांनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपलं मौन सोडलं आहे. ती घटना घडत असताना भाषण करणं चूक होती, असं म्हणत केजरीवाल यांनी माफी मागितलीय. त्याच वेळी हा विषय चघळून तुमचा टीआरपी वाढणार असेल, तर चघळत बसा, असा अनाहुत सल्लाही केजरीवालांनी मीडियाला देऊन टाकलाय.

बुधवारी आपच्या सभेत गजेंद्र सिंग या राजस्थानातल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली होती. गजेंद्र झाडावर फाशी लावून घेत असताना केजरीवालांसह आपचे तमाम नेते भाषणात दंग होते. यावर देशभरात टीकेची झोड उठलीये. दिल्ली पोलिसांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केलीये. संसदेमध्येही हा मुद्दा गाजलाय.

गजेंद्रच्या आत्महत्येवरून राजकारणही जोरात आहे. भाजप आणि काँग्रेसनं केजरीवालांची माफी पुरेशी नसल्याचं म्हटलंय. या घटनेबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी या दोन्ही पक्षांनी केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.