सोशल साईटवरील मित्रांनी केला तरूणीवर बलात्कार

दिल्लीत आणखी एक बलात्काराची घटना उघडकीस आलीये. 11वीत शिकणा-या एका मुलीवर दोघांनी बलात्कार केलाय. 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडलीये.

Updated: Jan 2, 2013, 03:55 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्लीत आणखी एक बलात्काराची घटना उघडकीस आलीये. 11वीत शिकणा-या एका मुलीवर दोघांनी बलात्कार केलाय. 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडलीये. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि एका आरोपीची सोशल नेटवर्क साईटवर ओळख झाली. या ओळखीतून आरोपीनं मुलीला 31 डिसेंबरच्या रात्री दक्षिण दिल्लीच्या एका मार्केटमध्ये भेटायला बोलावलं.
तिथं भेटल्यानंतर आरोपीच्या कारमधून पीडित तरुणी फिरायला गेली. रस्त्यात आरोपीनं तिच्या कोल्ड्रींकमध्ये गुंगी येणारं औषध टाकून ते तिला प्यायला दिलं. गुंगीच्या औषधामुळं बेशुद्ध झालेल्या मुलीला त्यांनी फ्लॅटवर नेलं तिथं आलेल्या दुस-या आरोपीनी मिळून मुलीवर बलात्कार केला. आरोपींच्या तावडीतून कशीबशी सुटका करवून घेतलेल्या मुलीनं पोलिसांत तक्रार केल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपींना अटक केली.
पकडलेले दोन्हीही आरोपी आयटी कंपनीत काम करतात. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना साकेत कोर्टात हजर केलं. कोर्टानं त्यांना कोठडी सुनावली असून आरोपींची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आलीये.