हैदराबाद : व्हॉट्सऍपवर दोन महिलांवर सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या प्रकरणातील सहा आरोपींचा शोध घेण्यात येतोय, यासाठी मदतीचं आवाहन देखिल करण्यात येत आहे.
महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या सुनीता कृष्णन या स्वयंसेवी संस्था चालवत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मला व्हॉट्सऍपवरून एक व्हिडिओ आला होता. व्हिडिओमध्ये दोन महिलांवर सहा जण सामूहिक बलात्कार करतानाचे दिसत आहे.
संबंधित व्हिडिओ यूट्यूबवर सुद्धा अपलोड करण्यात आला होता. परंतु, तेथून तो काढण्यात आला आहे. बलात्कार करणाऱ्यांची ओळख पटण्यासाठीच हा व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. दहा सेकंदाचा हा व्हिडिओ असून, सहा महिन्यांपूर्वीचा जुना आहे.'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.