नवी दिल्ली : पासपोर्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या वेळापासून आता नागरिकांना मुक्ती मिळणार आहे. आता फक्त सात दिवसांमध्ये तुम्हाला पासपोर्ट मिळू शकतो. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, वोटर आयडी आणि पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. याबरोबरच तुमच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं प्रतिज्ञापत्र देणंही बंधनकारक असणार आहे.
2014 या वर्षामध्ये एकूण 98 लाख 80 हजार पासपोर्ट देण्यात आले. देशामध्ये एकूण 37 पासपोर्ट सेवा केंद्र आहेत. या पासपोर्ट सेवा केंद्रामधून सरकारला वर्षाला 2 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तचा फायदा होतो.