मंडपात जाण्यापूर्वी तिने ठेवली अनोखी अट

हरियाणामध्ये एका वधूने लग्नाच्या मंडपात जाण्यापूर्वी अचानक एक अट ठेवली. त्यामुळे तेथील उपस्थित प्रत्येकाच्याच भूवया उंचावल्या. तिने तिच्या होणाऱ्या पतीपासून एक वचन मागितलं. वधूने मागितलेलं वचन ऐकून मात्र प्रत्येकालाच आनंद झाला. वधूने तेथे उपस्थित प्रत्येकाचं मन जिंकलं.

Updated: Dec 14, 2015, 07:03 PM IST
मंडपात जाण्यापूर्वी तिने ठेवली अनोखी अट title=

चंडीगड : हरियाणामध्ये एका वधूने लग्नाच्या मंडपात जाण्यापूर्वी अचानक एक अट ठेवली. त्यामुळे तेथील उपस्थित प्रत्येकाच्याच भूवया उंचावल्या. तिने तिच्या होणाऱ्या पतीपासून एक वचन मागितलं. वधूने मागितलेलं वचन ऐकून मात्र प्रत्येकालाच आनंद झाला. वधूने तेथे उपस्थित प्रत्येकाचं मन जिंकलं.
 
भिवानी येथील बिलावल गावची राहणारी पूनम हिने फेरे घेण्यापूर्वीच पतीकडून एक वचन मागितलं. त्यामुळे प्रत्येकाचाच श्वास अडकला असेल. पण तिने जेव्हा 11 गरजू मुलींचा शिक्षणाचा खर्च उचलण्याचं वचन आपल्या होणाऱ्या पतीकडून मागितलं. 

संदीप कुमार यानेही पुनमला वचन दिलं. त्यानंतर प्रत्येकाला त्यांचा अभिमान वाटावा असंच होतं. पूनम ही पोस्ट ग्रॅज्यूएट असून ती सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते. काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याने स्त्री भृण हत्या विरोधात आठवा फेरा घेतला होता. याची प्रेरणा घेऊनच तिने असं अनोखं वचन आपल्या होणाऱ्या पतीकडे मागितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.