चालत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये तरुणीची छेडछाड

डिब्रुगढ-दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्ये कथित स्वरुपात एका मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्याची एक धक्कादायक घटना समोर आलीय. महत्त्वाचं म्हणजे, या प्रकरणात सैन्यातील एका जवानाला मंगळवारी आसाममध्ये अटक करण्यात आलीय. 

Updated: Aug 20, 2014, 02:20 PM IST
चालत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये तरुणीची छेडछाड title=
प्रातिनिधिक फोटो

गुवाहाटी : डिब्रुगढ-दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्ये कथित स्वरुपात एका मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्याची एक धक्कादायक घटना समोर आलीय. महत्त्वाचं म्हणजे, या प्रकरणात सैन्यातील एका जवानाला मंगळवारी आसाममध्ये अटक करण्यात आलीय. 

पूर्वोत्तर सीमान्त रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय पीडित मुलगी आपल्या काकांसोबत थ्री टीयर एसी कम्पार्टमेंटमध्ये होती. एक्सप्रेस लुमडींग आणि चाम्परमुख स्टेशनदरम्यान असताना, सकाळी जवळपास चार वाजता एका जवानानं छेडण्याचा प्रयत्न केल्यानंतर या मुलीनं आरडा-ओरड सुरू केली. 

रेल्वे सुरक्षा दलानं (आरपीएफ) आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं आणि त्याला गुवाहीट रेल्वे स्टेशनवर राजकीय रेल्वे पोलिसांकडे सोपवलं. आरोपीचं नाव कुलविंदर सिहं आहे आणि तो सेनेच्या अमीनगाव कॅम्पमध्ये मिलिटरी इंजिनिअर सेवेत कार्यरत आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.