गोव्यात स्कर्टवर बंदीची मंत्र्यांची मागणी

 गोव्यातील मनोहर पर्रीकर सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांनी तरुणींच्या स्कर्टवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ढवळीकर यांनी गोव्याच्या नाईटक्लमबमध्ये तरुणींनी छोटे स्कर्ट घालण्यावर बंदीची मागणी केली आहे. तरुणींचे छोटे स्कर्ट गोव्याच्या संस्कृतीला धोका असल्याचे ढवळीकर म्हणत आहेत. 

PTI | Updated: Jul 1, 2014, 06:49 PM IST
  गोव्यात स्कर्टवर बंदीची मंत्र्यांची मागणी title=

पणजी :  गोव्यातील मनोहर पर्रीकर सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांनी तरुणींच्या स्कर्टवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ढवळीकर यांनी गोव्याच्या नाईटक्लमबमध्ये तरुणींनी छोटे स्कर्ट घालण्यावर बंदीची मागणी केली आहे. तरुणींचे छोटे स्कर्ट गोव्याच्या संस्कृतीला धोका असल्याचे ढवळीकर म्हणत आहेत. 

ढवळीकर यांनी पणजीतील एका उद्घाटन कार्यक्रमात बोलताना सांगितले, की तरुणींनी नाईटक्लबमध्ये छोटे स्कर्ट परिधान करणे हे गोव्याच्या संस्कृतीला धरून नाही. तरूणींचे प्रत्येक ठिकाणी छोटे स्कर्ट परिधान करणे हे गोव्याच्या संस्कृतीला धोका असल्याचे त्यांनी सांगितले. याची परवानगी आम्ही देणार नाही, यावर बंदी घातली पाहिजे. 

मंत्री सुदीन ढवळीकर यांचे वक्तव्य श्री राम सेना प्रमुखांकडून आलेल्या एका वक्तव्याशी मिळते जुळते आहे. ते म्हणाले होते की, गोव्यात महिलांनी छोटे स्कर्ट परिधान करणे, मादक पदार्थाचे सेवन करणे, यौन संबंध आणि नग्नता यावर बंदी घातली पाहिजे. भारतीय संस्कृती वाचविण्यासाठी गोव्यात श्री राम सेना एक शाखा सुरू करणार असल्याचे मुलातिक यांनी सांगितले होते.  ढवळीकर या म्हणाले की ते मुतालिक यांच्या वक्तव्याशी सहमत आहेत. मुतालिक यांनी म्हटलेल्या सर्व गोष्टी चुकीच्या नाहीत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x