परदेशी बाजारात मंदी, स्वस्त झालं सोनं- चांदी

दसरा- दिवाळीमध्ये भाव आकाशात भिडलेल्या सोन्याचे भाव गेल्या पाच दिवसांत १२२५ रुपयांनी उतरले आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीची किंमतही घसरली आहे. परदेशातील बाजारपेठेतील मंदीची झळ सोन्याला बसली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 2, 2012, 09:27 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
दसरा- दिवाळीमध्ये भाव आकाशात भिडलेल्या सोन्याचे भाव गेल्या पाच दिवसांत १२२५ रुपयांनी उतरले आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीची किंमतही घसरली आहे. परदेशातील बाजारपेठेतील मंदीची झळ सोन्याला बसली आहे.
लग्नसराईच्या काळातही सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनं सध्या फायदेशीर नाही. शुक्रवारअखेर ९९.५% स्टॅण्डर्ड १० ग्रॅम शुद्ध सोन्याचा दर ३१,४६५ रुपये होता. तोच दर आज ३१,२७५ रुपये झाला आहे. याचप्रमाणे ९९.९% शुद्ध सोन्याचे दर ३१,६१५ रुपयांवरून घसरून ३१,४३० रुपयांवर आला आहे.
चांदीचे भावही एक किलोमागे ८३० रुपयांनी उतरले आहेत. शुक्रवार अखेरीस शुद्ध चांदीचा दर ६३,५६५ रुपये इतका होता. तोच आज ६२,७३५ एवढा उतरला आहे. डॉलरचा भाव वाढल्यामुळे गुंतवणूकदार सोनं विकत आहेत. त्यामुळे परदेशी बाजारपेठेतील मंदीमुळे सोने-चांदी स्वस्त झाले आहेत.