आंतरराष्ट्रीय बदलांमुळे सोन्या-चांदीच्या किंमती पडल्या

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा घसल्यामुळे सोमवारी दिल्ली सराफा बाजारात  ९९.९ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ४१० रुपयांनी घसरून २६,६९० रुपयांवर स्थिरावलीय. तसंच चांदीचीही किंमत ५५० रुपयांनी घसरून ३८,००० रुपये प्रति किलोवर पोहचलीय. 

Updated: Mar 31, 2015, 08:41 AM IST
आंतरराष्ट्रीय बदलांमुळे सोन्या-चांदीच्या किंमती पडल्या title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा घसल्यामुळे सोमवारी दिल्ली सराफा बाजारात  ९९.९ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ४१० रुपयांनी घसरून २६,६९० रुपयांवर स्थिरावलीय. तसंच चांदीचीही किंमत ५५० रुपयांनी घसरून ३८,००० रुपये प्रति किलोवर पोहचलीय. 

चांदीच्या कॉईन्सचीही किंमत १,००० रुपयांनी घसरून ५६,००० रुपयांना लिलावात विकले गेले.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकतही सोन्याचा भावही ०.९९ टक्क्यांनी घसरून ११८७.९० डॉलर्स प्रति औंसवर पोहचला. तर चांदीही १.४२ टक्क्यांनी घसरून १६.७१ डॉलर प्रति औंसवर दाखल झालीय. 

मार्केट तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह या वर्षीच्या शेवटपर्यंत व्याज दरांमध्ये वाढ करणार असल्याच्या शक्यतेमुळे 'सुरक्षित गुंतवणूक' म्हणून सोन्यावर दबाव वाढतोय. 

अमेरिकन केंद्रीय बँकेचे अध्यक्ष जेनेट येलेन यांनी शुक्रवारी, यावर्षीच्या शेवटपर्यंत व्याजदरांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट केलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.