पोलिस भरती परीक्षा : १ हजार ८६ उमेदवारांची रवानगी जेलमध्ये

बिहारमधील दहावीच्या मुलांना कॉपी पुरवण्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला, या नंतर बिहारची खरी परीक्षा सुरू झाली, मात्र यानंतर आणखी एक मजेदार किस्सा चर्चेत आला आहे.

Updated: Mar 30, 2015, 07:10 PM IST
पोलिस भरती परीक्षा :  १ हजार ८६ उमेदवारांची रवानगी जेलमध्ये title=

पाटणा : बिहारमधील दहावीच्या मुलांना कॉपी पुरवण्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला, या नंतर बिहारची खरी परीक्षा सुरू झाली, मात्र यानंतर आणखी एक मजेदार किस्सा चर्चेत आला आहे.

बिहारमध्ये पोलिसांची भरती होती, या भरतीत मोठ्या प्रमाणात परिक्षार्थी हे बनावट असल्याचं समोर आलं आहे. पोलिस होण्यासाठी आलेल्या १ हजार ८६ उमेदवारांना आतापर्यंत जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भरती मंडळाने लावला तांत्रिक ट्रॅप

बिहारच्या पोलिस भरती व्यवस्थापकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिहार पोलिस भरतीत परीक्षा दिलेल्या उमेदवारांची तपासणी सुरू आहे. पोलिस भरतीत पास होण्यासाठी आपल्या जागी दुसऱ्याला बसवण्याचे प्रकार वाढले आहेत. बनावट परीक्षार्थी शोधण्याचं हे काम तांत्रिक पद्धतीने सुरू आहे. 

पास होण्यासाठी आपल्या नावावर दुसऱ्या उमेदवाराला बसवण्यात आलं, ही तपासणी १४ एप्रिलपर्यंत चालणार आहे, २ एप्रिल पासून महिला उमेदवारांचीही तपासणी होणार आहे.

बायमॅट्रीक डाटाने पकडण्यात आले उमेदवार
बिहार पोलिसांची भरती २०१४ मधील ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात आली होती, यात १२ हजार पदांसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. तेव्हा अनेक उमेदवार हे बनावट असल्याची माहिती भरती मंडळाला मिळाली होती, त्यावरून त्यांनी उमेदवारांच्या अंगठ्यांचे ठसे घेतले होते, तसेच हस्ताक्षरही पडताळून पाहण्यात आलं आहे, यात १०८६ जण आतापर्यंत बनावट असल्याचं समोर आलं आहे, त्यांची रवानगी थेट जेलमध्ये करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.