सोन्याला महिन्यानंतर झळाली, चांदीही महागली

दिवाळीच्या सणात सोने दरात किरकोळ घसरण झालेली पाहायला मिळाली. मात्र, एक महिन्यानंतर सोने दरात चढ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने प्रति 10 ग्राम 30,950 रुपये झाले आहे.

Updated: Nov 3, 2016, 11:00 AM IST
सोन्याला महिन्यानंतर झळाली, चांदीही महागली title=

नवी दिल्ली : दिवाळीच्या सणात सोने दरात किरकोळ घसरण झालेली पाहायला मिळाली. मात्र, एक महिन्यानंतर सोने दरात चढ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने प्रति 10 ग्राम 30,950 रुपये झाले आहे.

दिवाळीचा सण संपत आल्याने आता लग्न सराईचे दिवस येत आहेत. त्यामुळे दागिने घडविण्यासाठी अनेकांची धावपळ असते. त्यामुळे सोन्याची मागणी वाढलेली दिसत आहे. दिल्लीत सोने दर 250 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरानंतर सोने प्रथमच महागले आहे. सोने दर 30950 रुपये प्रति 10 ग्रमवर पोहोचलाय.

तर चांदीच्या दरातही वाढ दिसून येत आहे. किलोमागे 900 रुपयांनी ही वाढ झालेली आहे. चांदीचा एक किलोचा भाव 44100 रुपये आहे. बाजारच्या सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार पाचव्या दिवशी सोने दरात चढ दिसून येत आहे. सोने दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.