सोन्या-चांदीच्या दरात वाढ

ऐन लग्नसराईच्या मोसमात मागणी वाढल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. 

Updated: Jan 31, 2016, 04:03 PM IST
सोन्या-चांदीच्या दरात वाढ title=

नवी दिल्ली : ऐन लग्नसराईच्या मोसमात मागणी वाढल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. 

सोन्याचे दर प्रति तोळ्याला २७ हजार रुपये आहे. तर चांदीचे दर प्रति किलो ३५ हजार रुपये झालेत. लग्नसराईचा मोसम असल्याने सोन्याची मागणी वाढलीये. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्याने त्याच परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीवर दिसून येतोय.

गेल्या काही महिन्यांपासून मागणी नसल्याने सोन्याच्या दरात घसरण सुरु होती. मात्र आता मागणी वाढल्याने दरही वाढलेत.