मुंबई : नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात सोने खरेदीचा विचार असेल तर त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत होत असल्याने या महिन्यात सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव २४,७४०- २५-९१४ दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी १७ डिसेंबरला सोन्याने २४, ७४० रुपयांपर्यंतचा नीचांकी स्तर गाठला होता. याचदरम्यान अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने तब्बल दशकभरानंतर व्याजदरात वाढ केली. २०१५च्या अखेरीस सोन्याचा दर प्रति ग्रॅम २४ हजार ९३१ रुपयांवर बंद झाला होता.
या महिन्यात सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. डॉलर मजबूत होत असल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होतोय. स्थानिक बाजारात सोन्याचे दर घसरल्यास विक्रीच्या संख्येत वाढ होते.