नवी दिल्ली : बहुमुल्य समजलं जाणाऱ्या सोन्याची झळाळी दिवसेंदिवस कमी होताना दिसतेय. बाजारात सोन्याची मागणी दिवसेंदिवस कमी होत जाताना दिसतेय... साहजिकच, यामुळे सोन्याची किंमतही घसरतेय.
गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं खरेदी करणाऱ्यांनी आता इतर पर्यायांचा विचार आणि वापर सुरु केल्यानं सोन्याला हे दिवस दिसत आहे. संपूर्ण जगाभरात सोन्याच्या खरेदीसाठी भारताचा दुसरा क्रमांक लागतो. काही वर्षांपर्यंत भारत सोनं खरेदीसाठी क्रमांक एकवर होता. पण, सोन्याची किंमत झटपट वाढल्यानं देशातल्या खररेदीदारांनी विचार करून सोनं खरेदी करणं सुरु केलं. आता, सध्या चीन सोनं खरेदीसाठी पहिल्या क्रमांकावर आहे.
या जूनच्या त्रैमासिक भागात भारतात केवळ 49.6 टन सोन्याची आयात झालीय. परंतु, सोन्याचे भाव आणि त्याच्या खरेदीदारांची संख्याही घटताना दिसतेय. गुंतवणूकदारांनी सोनं सोडून फिक्स्ड डिपॉझिट आणि शेअर्सचा हात धरलाय
2013 मध्ये सोन्यानं किंमतीचा आत्तापर्यंतचा सर्वोच्च टप्पा गाठला होता. ऑगस्ट 2013 मध्ये सोन्याची किंमत 35,074 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत पोहचलं होतं... पण, त्यानंतर मात्र सोन्याच्या किंमतीत घसरण सुरू झाली. आता, हे दर 27,000 रुपये प्रति दहा ग्रामपर्यत येऊन पोहचलेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्याची चिन्हं आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.