‘लव्ह जिहाद करणाऱ्यांना ठार मारायला हवं’

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात कथित ‘लव्ह जिहाद’वर चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ’ बोर्डाचे उपाध्यक्ष आणि शिया धर्मगुरु कल्बे सादिक यांनी आता याच मुद्द्यावर एक वादग्रस्त विधान केलंय. 

Updated: Sep 12, 2014, 02:38 PM IST
‘लव्ह जिहाद करणाऱ्यांना ठार मारायला हवं’  title=

वाराणसी : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात कथित ‘लव्ह जिहाद’वर चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ’ बोर्डाचे उपाध्यक्ष आणि शिया धर्मगुरु कल्बे सादिक यांनी आता याच मुद्द्यावर एक वादग्रस्त विधान केलंय. 

वाराणसीत बोलताना कल्बे सादिक यांनी ‘जो मुस्लिम लव्ह जिहाद करत असेल त्याला ठार मारायला हवं’ असं वक्तव्य केलंय. 

'लव्ह जिहाद'मध्ये अडकलेल्या आपल्या मुलांबाबतीत पालकांनी कठोर भूमिका घ्यायला हवी... खरा मुसलमान लव्ह जिहादच्या चक्करमध्ये कधीच पडणार नाही. प्रेम आणि लग्नाच्या नावावर धर्मांतर करणं इस्लाममध्ये ‘जायज’ नाही. संपूर्ण मुस्लिम धर्मालाच या नावावर बदनाम करणं चुकीचं आहे, असं सादिक यांनी म्हटलंय. 

कल्बे सादिक यांनी, आपल्याला पाकिस्तानात जाण्यावर बंदी घालण्यात आल्याचा खुलासाही यावेळी केलाय. तिथं होणाऱ्या छळाविरुद्ध बोलताना आढळल्यामुळे त्यांच्यावर ही बंदी घालण्यात आलीय.

अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, इस्लाममध्ये ‘लव्ह जिहाद’ नावाची कोणतीही संकल्पना अस्तित्वातच नाही आणि हा शब्द चुकीच्या पद्धतीनं घेतला जातोय. तर याविरुद्ध, उत्तर प्रदेशात अनेक संस्थांकडून ‘लव्ह जिहाद’ विरोधात जोरदार आंदोलनं सुरु आहेत. 

सादिक यांच्याशिवाय ‘अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी’चे सुन्नी धर्मशास्त्र विभागाचे अध्यक्ष मुफ्ती जाहिद अली खान आणि असोसिएट प्रोफेसर एम. सलीम यांच्या म्हणण्यानुसार, कुणालाही कोणत्याही पद्धतीनं खोटं आश्वासन देणं, निर्दोष मुलींना फसवणं याची इस्लामनं कधीच परवानगी दिलेली नाही उलट हे कृत्य ‘घृणास्पद’ मानलं गेलंय. ‘लव्ह जिहाद’ कुणी करत असेल आणि यासाठी कोणत्याही पद्धतीचा तर्क मांडत असेल तर तो ‘इस्लाम’वर घोर अन्याय करत आहे.

या सगळ्यांनीच लव्ह जिहाद या शब्दाची कठोर शब्दांत निंदा केलीय. या मुद्द्याला उठवणारे केवळ समाजाला दोन भागांत विभागू इच्छित आहेत, असं त्यांचं स्पष्ट मत आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.