नवी दिल्ली : जागतीक बाजारात सध्याच्या उच्च स्तरावर मागणी कमकुवत पडल्यानंतर दिल्ली सराफा बाजारात सोन्यात तीन दिवसातील तेजी संपली आणि भाव १८० रुपयांनी कमी होऊन २७२०० प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर औद्योगिक मागणी आणि शिक्के निर्मात्यांची उचल कमी केल्याने चांदीचे भाव ११५० रुपयांनी कमी झाले त्यामुळे चांदी प्रति किलोला ३७०५० पर्यंत खाली गेली.
कमी मागणीमुळे सोने आणि चांदीच्या दरात घट आली आल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. न्यू यॉर्कमध्ये सोन्याचे भाव १.२ टक्क्यांनी कमी झाले. त्यामुळे १२०७.७० डॉलर आणि चांदीचे भाव २.९ टक्के कपात होऊन १६.५६ डॉलर प्रति औंस होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.