नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या बदलांमुळे तसंच किंमती दागिने निर्मात्यांकडून कमी झालेल्या मागणीमुळे गेला संपूर्ण आठवडाभर दिल्ली सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किंमती पडलेल्या पाहायला मिळाल्या.
बाजार सूत्रांच्या माहितीनुसार, फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदरांत वाढ होण्याच्या शक्यतेचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर जाणवला. गेल्या नऊ आठवड्यांतील सर्वांत खालच्या स्तरावर घसरलीय. घरगुती बाजारावर परिणाम करणाऱ्या न्यूयॉर्कच्या बाजारातही सोन्याचे भाव घसरून 1200.90 डॉलर आणि चांदीचे भाव घसरून 16.70 डॉलर प्रति औंसवर पोहचलेत.
दिल्लीत सोनं 99.9 आणि 99.5 शुद्धतेसाठी क्रमश: 26,575 रुपये आणि 26,425 रुपये प्रति ग्रॅमवर दाखल झालेत. तयार चांदीचेही भाव 950 रुपयांच्या घसरणीसह 37,600 रुपयांवर दाखल झालेत. चांदीच्या शिक्क्यांचे भाव 1000 रुपयांच्या घसरणीसह 56,000:57,000 रुपये प्रति शेकडा बंद झालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.