नवी दिल्ली : केंद्र सरकारने न्यायाधीश दीपक मिश्रा आणि शिवकीर्ती सिंह यांच्या समोर मॅगीचा लॅब रिपोर्ट आज सादर केला. पहिल्या रिपोर्टनुसार मॅगीमध्ये शिसे योग्य प्रमाणात आहे. नेस्लेने याबाबत कोर्टोत याचिका दाखल केली आहे.
म्हैसूरच्या प्रयोगशाळेत मॅगीच्या परिक्षणाचा पहिला रिपोर्ट बंद पाकिटात कोर्टामध्ये सादर करण्यात आला. पण एफएसएसएआईने म्हटलं की मॅगीमध्ये नको असलेल्या गोष्टींचं प्रमाण किती आहे हे मॅगीच्या उत्पादनावेळीच पाहिलं जाऊ शकतं, बनल्यानंतर नाही.
केंद्र सरकारने म्हटलं की, म्हैसूरच्या प्रयोगशाळेने आतापर्यंत याबाबतीत १६ रिपोर्ट सादर केले आहे.