'गूगल ट्रेन्ड'नं उघड केली 'पॉर्न प्रेमी' भारताची धक्कादायक आकडेवारी...

पॉर्न सर्चमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या जगातील टॉप 10 शहरांमध्ये भारताच्या तब्बल सहा शहरांचा समावेश आहे. एका अहवालातून हे सत्य उघड झालंय. 

Updated: Oct 9, 2015, 12:35 PM IST
'गूगल ट्रेन्ड'नं उघड केली 'पॉर्न प्रेमी' भारताची धक्कादायक आकडेवारी...

नवी दिल्ली : पॉर्न सर्चमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या जगातील टॉप 10 शहरांमध्ये भारताच्या तब्बल सहा शहरांचा समावेश आहे. एका अहवालातून हे सत्य उघड झालंय. 

'गूगल ट्रेन्ड'नं जाहीर केलेल्या माहितीनुसार, पॉर्न पाहण्यात जगात सर्वात आघाडीवर आहे ती भारताची राजधानी दिल्ली... त्यानंतर महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई, हावडा (पश्चिम बंगाल), उन्नाव (उत्तरप्रदेश) , क्वॉलालूंपूर आणि बंगळूरू

प्राण्यांच्या पॉर्न फिल्म पुण्यात आघाडीवर... 
या माहितीनुसार, नवी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूला मागे टाकत पुण्यानं प्राण्यांचे पॉर्न पाहण्यात बाजी मारलीय. 

'रेप पॉर्न' जास्तीत जास्त सर्च... 
धक्कादायक म्हणजे, 2008 पासून कोलकाता, हावरा, नवी दिल्ली, अहमदाबाद आणि पुण्यातील नेटिझन्स 'रेप पॉर्न' पाहण्यात जास्त रुची दाखवताना दिसतायत.

उन्नावची 'चाईल्ड सेक्स'मध्ये रुची... 
उत्तर प्रदेशातल्या सर्वात छोट्या भागात म्हणजेच उन्नावमध्ये 'चाईल्ड सेक्स' मोठ्या प्रमाणात पाहिलं जातंय, अशी धक्कादायक माहितीही यातून उघड झालीय.

जगात पहिल्या नंबरवर अमेरिका...
- ऑनलाईन पॉर्न पाहणाऱ्या देशांमध्ये अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. 
- दुसऱ्या स्थानावर आहे यूनायटेड किंगडम
- आणि पॉर्न पाहण्याता तिसरा क्रमांक पटकावलाय तो नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भारतानं... 

डाटा बरोबर असला तरी तो पूर्ण नाही - तज्ज्ञ
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गूगल ट्रेन्डचा हा डाटा बरोबर असला तरी परीपूर्ण नाही. चीन, रशिया आणि नॉर्थ कोरियांसारख्या देशात जिथं गूगल वापरलं जात नाही किंवा काही प्रमाणात वापरलं जातं... 

शिवाय, यूएस, यूके सारख्या देशांत गूगलशिवाय इतरही सर्च इंजिन वापरले जातात. त्यांची आकडेवारी यामध्ये नाही.

प्रगत देशांतील लोक बऱ्याचदा पॉर्न या नावानं सर्च करण्यापेक्षा सरळ पॉर्न साईटवरच जातात. पण, भारतात मात्र लोक पॉर्न किंवा सेक्स असे शब्द वापरून सर्च करतात आणि मग ज्या लिंक समोर दाखवल्या जातात त्यांवर क्लिक करतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.