भाजप नेत्यांकडून चूक, गोखलेंची जयंती लोकमान्य टिळकांचा फोटो

भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी मोठी चूक केलेय. ट्विट करताना त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांच्या जयंती निमित्ताने लोकमान्य टिळकांचा फोटो अपलोड केला. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 9, 2017, 10:53 AM IST
भाजप नेत्यांकडून चूक, गोखलेंची जयंती लोकमान्य टिळकांचा फोटो

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी मोठी चूक केलेय. ट्विट करताना त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांच्या जयंती निमित्ताने लोकमान्य टिळकांचा फोटो अपलोड केला. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.

व्यंकय्या नायडू यांची ही चूक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यानंतर नायडू यांच्यावर चौहोबाजुने टीका होत आहे. एकाने तर नायडूंना सल्ला दिलाय, तुमची सोशल मीडिया टीम बदला. टीका होऊ लागल्यानंतर तात्काळ ती पोस्ट हटविण्यात आली. लगेच दुसरी टाकण्यात आली.