नवी दिल्ली : सरकारने बुधवारी संसदेत दिलेल्या माहितीनुसार अश्लील गोष्टी दाखवणाऱ्या ३ हजार वेबसाईट आणि युआरएल बंद केल्या आहेत. लोकसभेत एका प्रश्नाला लिखित उत्तर देतांना माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटलं की या अश्लील वेबसाइट भारता बाहेरील आहेत.
गृह मंत्रालय महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी सायबर क्राईम प्रोटेक्शनवर काम करत आहे. जो ऑनलाईन सायबर गुन्ह्यांवर देखील नजर ठेवून असणार आहे.
इंटरपोल अत्यंत अश्लील अशा गोष्टींची यादी बनवतो आणि सरकार सीबीआयकडून चौकशीनंतर त्यावर बंदी आणते.