नवी दिल्ली : आता देशात दोन लाखाहून अधिक रुपयांच्या रोखीच्या व्यवहारावर आता मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागणार आहे.
केंद्र सरकारने वित्त संशोधन विधेयकात सध्या तीन लाख रुपयांच्या रोखीच्या व्यवहाराची मर्यादा दोन लाख रुपयांवर आणलीये. प्रस्तावानुसार दोन लाख रुपयांहून अधिक रोखीच्या व्यवहार करणाऱ्यांना चाप बसणार आहे.
दोन लाख रुपयांहून अधिक रोखीचे व्यवहार करणाऱ्यांना तब्बल १०० टक्के दंड भरावा लागणार आहे. म्हणजेच एखाद्याने जर दोन लाख रुपयांचा व्यवहार रोखीने केला तर त्याला तितकेच म्हणजे तब्बल दोन लाख रुपये दंड भरावा लागेल.