पेमेंट करण्यासाठी मोदी सरकारची नवी प्रणाली

कॅशलेस ट्रांजेक्‍शनला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. IndiaQR मोड सोमवारी 20 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. IndiaQR एक कॉमन QR कोड आहे. ज्याला सर्व महत्त्वाच्या कंपन्यांनी मिळून तयार केलं आहे.

Updated: Feb 20, 2017, 09:33 AM IST
पेमेंट करण्यासाठी मोदी सरकारची नवी प्रणाली title=

नवी दिल्ली : कॅशलेस ट्रांजेक्‍शनला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. IndiaQR मोड सोमवारी 20 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. IndiaQR एक कॉमन QR कोड आहे. ज्याला सर्व महत्त्वाच्या कंपन्यांनी मिळून तयार केलं आहे.

भारतीय रिजर्व्ह बँकेच्या सुचनेनुसार मास्टरकार्ड, वीजा आणि अमेरिकन एक्सप्रेस शिवाय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी रुपेकार्डला चालवते. IndiaQR कोणत्याही ग्राहकाला त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करुन रीटेल पेमेंट करण्याची परवानगी देतो ज्यांच्याकडे डेबिट कार्ड आहे.
 
या कोडच्या माध्यमातून सगळ्या 4 महत्त्वाच्या कार्डची माहिती मिऴवता येणार आहे.
रिजर्व्ह बँक 20 फेब्रुवारीपासून IndiaQR लाँच करण्याची तयारी करत आहे. सुरुवातील 5-8 बँक लाइव्ह असतील. हा कोड बँकेच्या मोबाईल अॅपवरही काम करणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, पॉइंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनल नाही आहे अशा जागी सुद्धा पेमेंटसाठी समस्या येणार नाही.
 
QR Code

- IndiaQR बँकांच्या मोबाईल अॅपवर काम करेल.

- पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना स्मार्टफोनवर मोबाईल बँकिंग अॅप असणं गरजेचं आहे.

- त्यानंतर मर्चेंटचा QR कोड स्कॅन करावा लागेल.

- पेमेंट करण्यासाठी मग रक्कमचा आकडा टाकावा लागेल.

- यानंतर पेमेंट झाल्याचा मॅसेज स्क्रीनवर दिसेल.