मोदी सरकारचा आईस्क्रीमवर राग

एक्साईड ड्युटीवर दिलेली सूट कमी .

Updated: Feb 10, 2016, 10:19 PM IST
मोदी सरकारचा आईस्क्रीमवर राग title=

मुंबई : लहानथोर सर्वांच्या आवडीचं आणि जीवाला गारेगार करणारं आईस्क्रीम महाग होण्याची चिन्हं आहेत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, आईस्क्रीमची दरवाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. 

आईस्क्रीम तसंच इतर पदार्थांवरच्या एक्साईड ड्युटीवर दिलेली सूट कमी करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहेत. त्यामुळे तुमच्या आमच्या पसंतीचं आईस्क्रीम महाग होऊ शकतं. 

गूड्स अँड सर्वीस टॅक्स म्हणजेच जीएसटीकरता, एक्साईज ड्यूटीमध्ये सूट दिलेल्या वस्तूंवर कर आकारण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे जीवाला गारेगार करणारं आईस्क्रीम, यापुढे खिशाला मात्र चटका देणारं ठरु शकतं.