नवी दिल्ली : भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईककरून दहशतवादी तळांवर हल्ले केले. या सर्जिकल स्ट्राईकबाबत पुरावे द्यावेत अशी मागणी काही जणांकडून होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारनं संसदेच्या सुरक्षा समितीच्या सदस्यांना सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ दाखवण्याचा निर्णय घेतला आहे, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं दिलं आहे.
14 ऑक्टोबरला हा व्हिडिओ सुरक्षा समितीच्या सदस्यांना दाखवण्यात येणार आहे. सुरक्षा समितीच्या सदस्यांमध्ये 31 जणांचा समावेश आहे.