नवी दिल्ली : भारत सरकार आपल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील महिन्यापासून योगाचे वर्ग सुरू करणार आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार २० मार्च रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार १ एप्रिल पासून योग क्लासेस सुरू होणार आहेत.
एका अंदाजानुसार केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्यावर आधारीत लोकांची संख्या जवळ-पास ३० लाखांपर्यंत आहे.
योग या विषयाला प्रोत्साहन देण्यामागे भाजपाची भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी संयुक्त राष्ट्रच्या मंचावरून योगचं महत्व सांगितलं होतं. यानंतर संयुक्त राष्ट्रने घोषणा केली होती की, २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.