नवी दिल्ली : घरकामगारांसाठी एक गुड न्यूज आहे. घरकामगारांना आता दरमहा किमान नऊ हजार रुपये पगार, भरपगारी रजा आणि मॅटर्निटी लिव्ह मिळणार आहे.
घरकामगारांसाठी तयार करण्यात आलेल्या धोरणानुसार कामगारांची कुशल, अकुशल, अर्धकुशल, आणि अतिकुशल अशी वर्गवारी करण्यात आलीय. मालक, कामगार संघटना, मध्यस्थ यंत्रणा यांच्यात झालेले करार सर्वांना बंधनकारक असतील.
घरगुती कामगारांना दरवर्षी १५ दिवसांची भरपगारी रजा आणि महिलांना प्रसूतीसाठी रजा द्यावी लागणार आहे. मोलकरणींना प्रसुतीनंतर रजा देण्याऐवजी कामावरुन काढून टाकण्याचा पर्याय मालक अवलंबतात... मात्र, नव्या धोरणानुसार महिलांना प्रसुतीसाठी रजा द्यावी लागणार आहे.
घरकामगारांना या गोष्टींपासून संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या निकषानुसार राष्ट्रीय धोरण बनवलंय. घरकामगारांच्या धोरणाचा मसुदा कामगार कल्याण महासंचालकांनी तयार करुन तो कामगार मंत्रालयाला सादर केलाय. लवकरच त्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येणार आहे.
नव्या धोरणानुसार घरकामगारांना...
- शिक्षण पूर्ण करण्याचा हक्क
- तक्रार निवारणासाठी यंत्रणा
- संघटना स्थापन करण्याचा हक्क
- मागण्यांसाठी बोलणी करणे
असे हक्कही मिळणार आहे... आणि या नियमांची अंमलबजावणी सर्व यंत्रणांना बंधनकारक असतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.