श्रीनगरमध्ये अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात ८ जखमी

जम्मूतील अरनिया सेक्टरमध्ये हल्ल्याला दोन दिवस झाले नाही तो शनिवारी दुपारीश्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात संशयीत अतिरेक्यांनी ग्रेनेड हला केला.या हल्ल्यात ८ लोक जखमी झालेत.

Updated: Nov 29, 2014, 05:56 PM IST
श्रीनगरमध्ये अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात ८ जखमी

श्रीनगर : जम्मूतील अरनिया सेक्टरमध्ये हल्ल्याला दोन दिवस झाले नाही तो शनिवारी दुपारीश्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात संशयीत अतिरेक्यांनी ग्रेनेड हला केला.या हल्ल्यात ८ लोक जखमी झालेत.

दरम्यान, अतिरेक्यांनी लष्करी जवानांना टार्गेट करण्यासाठी हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर जवानांनी पूर्ण परिसरात नाकेबंदी केली आहे.

ग्रेनेड हल्ल्यात सात नागरिकांसह एक केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) जवान जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या तळाला लक्ष करून दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर, गुप्तचर विभागाचे अधिकारी तपास करीत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.