नवी दिल्ली : गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स अर्थात जीएसटी विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलंय. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्रचंड गोंधळात हे विधेयक सादर केलं.
सरकार घाईगडबडीत विधेयक आणत असल्याचा आरोप काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी केला. यासंदर्भातल्या घटनादुरूस्ती विधेयकाला स्थायी समितीनं मंजुरी दिली नसल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे.
याबाबत सरकारची भूमिका पारदर्शक नसल्याचा आरोप करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सभात्याग केला.
एआयएडीएमके आणि बीजू जनता दलानंही विधेयक मांडण्यास विरोध केला होता, मात्र सभात्याग केला नाही. GST लागू झाल्यानंतर राज्यांना महसूल मिळणार नाही, ही राज्यांची भीती अनाठायी असल्याचं जेटली यावेळी म्हणाले.
लोकसभेत संख्याबळावर विधेयक संमत करून घेण्याचा सरकारचा विचार असला, तरी राज्यसभेत याची गत भूमी अधिग्रहण विधेयकासारखीच होऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.