नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या पीएफ (निवृत्ती वेतन)मधील पैसे ५ वर्षांच्या आधीच काढलेत तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे पाच वर्षांनंतर पैसे काढण्याचा विचार करावा.
परदेशी गुंतवणुकीला वाव देण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राधान्य देत आहे. तसा दावा मोदींकडून करण्यात येत आहे. त्यासाठी कर प्रणाली मोडीत काढण्याचे आमचे धोरण असल्याचे ते सांगतात. मात्र, दुसरीकडे कर आकारणी करण्यावर मोदींचा भर असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. पीएफ पैशावर कर आकरणी करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसेल, असे विरोधकांनी म्हटलेय.
देशातील कोट्यवधी लोकांच्या निवृत्तीच्या पैशावर मोदी सरकारचा डोळा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोदी सरकार आयटी विभागाने वित्त विधेयकात एक अशी अट जोडलीआहे की, ५ वर्षांच्या आधी पैसे पीएफमधून काढल्यास त्यावर टॅक्स मोजावा लागेल.
पीएफ धारकांसाठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. नव्या नियमानुसार महिना २१२० रुपये मिळवणाऱ्यालाही टॅक्स द्यावा लागणार आहे. वार्षिक २.५० लाख रुपये मिळकतीवर इन्कम टॅक्समध्ये सुट आहे. म्हणजे २१,००० रुपये. तर १ जून पासून ३०,००० रुपयांपेक्षा जास्त निवृत्ती बचतीवर १०.३ टक्के टॅक्स असेल. तर पाच वर्षांच्या आधी खात्यातून पैसे काढले तर त्याला टॅक्स द्यावा लागेल. त्यानुसार ३०.६ टक्के मार्जिनल रेट प्रमाणे टॅक्स द्यावा लागेल. इन्कम टॅक्सच्या नव्या कलम १९२ ए मध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही, त्यांना जास्त टॅक्स द्यावा लागेल. तर रिटर्न फायल्स केल्यास त्याला सूट मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.