नवी दिल्ली : बहुचर्चीत जीएसटी १ जुलैपासून लागू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत घोषणा केलीय. यापूर्वी 1 एप्रिलपासून जीएसटी लागू होणार होता. मात्र अंमलबजावणीचा तारीख पुढे ढकलत आता 1 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आलीय. जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
दीड कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांच्या कराचा 90 टक्के रक्कम राज्यांना देण्यात आला आहे तर उरलेली 10 टक्के रक्कम ही केंद्र सरकारला मिळणार असल्याचं निश्चित झाल्यामुळे आजच्या बैठकीत जीएसटीवर तोडगा निघाला आहे. दीड कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांच्या कराची 50 टक्के रक्कम केंद्र आणि उरलेली 50 टक्के रक्कम राज्य सरकारला मिळणार आहे.