www.24taas.com, गुवाहाटी
गुवाहटीमध्ये पबबाहेर एका मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुवाहाटीच्या उच्च न्यायालयाने आज एकूण १६ आरोपींपैकी ११ जणांना दोषी ठरविले.
स्थानिक वृत्तवाहिनीचा वार्ताहर गौरव ज्योती नियोग याला दोषमुक्त केले आहे. पीडित मुलीचा विनयभंग करण्यासाठी जमावाला भडकाविल्याचा आणि विनयभंगाचे चित्रीकरण केल्याचा आरोप नियोग याच्यावर ठेवण्यात आला होता.
नियोग याने केलेले चित्रीकरण स्थानिक वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आले होते. सोशल मीडियावर या चित्रीकरणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे नियोगला 15 जुलै रोजी राजीनामा देण्यात सांगण्यात आले होते. त्यानंतर 21 जुलैला त्याला पोलिसांनी अटक केली.
9 जुलै रोजी गुवाहाटीच्या ख्रिश्चन बस्ती परिसरातील एका वर्दळीच्या मार्गावर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. सुमारे 40 जणांच्या जमावाने पबमधून बाहेर पडलेल्या 20 वर्षीय मुलीचा विनयभंग केला होता.