केस कापणारा झाला अरबपती

केस कापणारा व्यक्ती अरबपती झाला असं ऐकल्यावर तुम्हाला खरं वाटणार नाही पण हे सत्य आहे. रमेश यांच्याकडे आज तब्बल ६७ महागड्या गाड्या आहेत.

Updated: Dec 29, 2015, 08:10 PM IST
केस कापणारा झाला अरबपती  title=

बंगळुरू : केस कापणारा व्यक्ती अरबपती झाला असं ऐकल्यावर तुम्हाला खरं वाटणार नाही पण हे सत्य आहे. रमेश यांच्याकडे आज तब्बल ६७ महागड्या गाड्या आहेत.

रमेश हे जेव्हा ७ वर्षाचे होते तेव्हाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या आईने तिन्ही भावंडांचा सांभाळ केला. रमेश यांनी दूध आणि पेपर टाकण्याचं काम सुरू केलं. 

१९८९ मध्ये त्यांनी केस कापण्याचे काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी काही पैसे जमवून एक मारुती कार घेतली आणि ती भाड्याने दिली. 

२००४ मध्ये रमेश यांनी स्वत:ची ट्रॅवल कंपनी सुरू केली. त्यांच्याकडे आज रोल्स रॉयल, मर्सिडीज, बीएमडब्लू, जॅगवॉर अशा ६७ महागड्या गाड्या आहेत.

अरबपती झाल्यानंतरनेही त्यांनी त्यांचा केस कापण्याचं काम सोडलं नाही. ते दररोज किमान २ तास तरी दुकानात जाऊन ग्राहकांचे केस कापतात.