चेन्नई : योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली उत्पादनात गोमूत्र वापरण्यात येत आहेत, हे इस्लामच्या विरोधातील 'हाराम' आहे. त्यामुळे ही उत्पादने वापरु नयेत, अशा फतवा एका मुस्लिम संघटनेने काढलाय.
तामिळनाडूतील एका मुस्लिम संघटनेने रामदेव बाबा यांच्या पतंजली उत्पादनाविरोधात फतवा जारी केलाय. गोमूत्र वापरुन उत्पादने बनविण्यात आली आहेत. गाईचे मूत्र वापरलेली सौंदर्य प्रसाधने, औषधे, खुल्या बाजारात तसेच ऑनलाईन उपलब्ध आहेत.
दरम्यान, मुस्लिम धर्मात गाईचे मूत्र हाराम (निषिद्ध) आहे. त्यामुळे ही उत्पादने योग्य नाहीत. जनजागृतीसाठी हा फतवा असल्याचे टीएटीजेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.