हार्दिक पटेल आणि आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

गुजरातमधील पाटीदार समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आंदोलन छेडणाऱ्या हार्दिक पटेल यांना आणि आंदोलन करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सूरत पोलिसांनी ताब्यात घेतले. आज समता रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, ती काढण्याआधीच  पोलिसांनी त्यांना उचलले.

PTI | Updated: Sep 19, 2015, 01:03 PM IST
हार्दिक पटेल आणि आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात title=

सूरत : गुजरातमधील पाटीदार समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आंदोलन छेडणाऱ्या हार्दिक पटेल यांना आणि आंदोलन करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सूरत पोलिसांनी ताब्यात घेतले. आज समता रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, ती काढण्याआधीच  पोलिसांनी त्यांना उचलले.

हार्दिक पटेल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने गुजरातमध्ये पटेल समाजाला ओबीसींचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता आणखीनच चिघळण्याची शक्यता वर्तविण्यातआलेय.

या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पटेल आणि पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या  १९ नेत्यांना सूरत पोलिसांनी ताब्यात घेतले. पाटीदार समाजाच्या नेत्यांनी एकता रॅली आयोजित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी यापूर्वीच एकता रॅलीला परवानगी नाकारली होती. मात्र, शनिवारी सकाळी अचानकपणे मगध चौकातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला हार घालून समितीच्या नेत्यांनी एकता यात्रेचा प्रारंभ करण्याचा प्रयत्न केला.

 दरम्यान, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल शनिवारी एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी सूरतमध्ये  येणार आहेत. त्यामुळे सूरत पोलिसांकडून ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x