आई-वडिलांची हत्या करुन दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

हरियाणातील डिगरहेडी गावात अज्ञात व्यक्तींनी एक दाम्पत्याची हत्या करुन त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला आहे.

Updated: Aug 26, 2016, 04:29 PM IST
आई-वडिलांची हत्या करुन दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार title=

मेवात: हरियाणातील डिगरहेडी गावात अज्ञात व्यक्तींनी एक दाम्पत्याची हत्या करुन त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला आहे.

डिगरहेडी गावात इब्राहिम आपल्या कुटुंबासोबत राहतो, काही अज्ञात व्यक्तींनी दुपारी इब्राहिमच्या घरात शिरुन इब्राहिम आणि त्याच्या पत्नीची हत्या केली. 

घरात उपस्थित असलेल्या इब्राहिमच्या दोन अल्पवयीन मुलींवर त्या व्यक्तींनी सामूहिक बलात्कार करुन आणखी घरातील सहा लोकांना जखमी करुन फरार झाले आहेत.

या घटनेच्या आरोपी विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, जखमींवर शहीद हसन खान मेवाती मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी आरोपींचे काही संकेत नसल्यामुळे पोलीसांचा तपास सुरू आहे.