हेमामालिनी यांनी साजरी केली होळी

मथुरेच्या खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनींनी रथोत्सवात सहभागी होत होळी साजरी केली. मथुरेत आयोजित करण्यात आलेल्या लठमार होळीमध्ये हेमामालिनी स्वतः राधेच्या रुपात आल्या आणि त्यांनी कृष्णासोबत होळी खेळली. 

Updated: Mar 15, 2016, 11:16 AM IST
हेमामालिनी यांनी साजरी केली होळी title=

नवी दिल्ली : मथुरेच्या खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनींनी रथोत्सवात सहभागी होत होळी साजरी केली. मथुरेत आयोजित करण्यात आलेल्या लठमार होळीमध्ये हेमामालिनी स्वतः राधेच्या रुपात आल्या आणि त्यांनी कृष्णासोबत होळी खेळली. 

ही होळी पाहण्यासाठी परिसरातल्या नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. तर कानपूरमध्ये पाणी आणि रंग न वापरता होळी साजरी करण्यात येत आहे. होळीसाठी यंदा फुलांचा उपयोग करण्यात येतोय. कानपूरमधल्या मंदिरात कलाकारांनी फुलांच्या होळीचं आयोजन केलं होतं. यावेळी संगीताच्या तालावर भाविकांनी होळी साजरी केली.