नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेमध्ये हजेरी लावली. राज्यसभेमध्ये मोदींच्या आगमनानंतर काही वेळ घोषणांनी दुमदुमून निघाला होता. भाजप खासदारांनी बाक वाजवून मोदींचं स्वागत केलं. भाजप खासदारांच्या या जल्लोषामुळे विरोधी खासदारांनी उपरोधिक टीका करायला सुरुवात केली.
मोदी येताच विरोधी खासदार कौन आया रे कौन आया च्या घोषणा देऊ लागले. यावर भाजप खासदारांनी हिंदुस्तान का शेर आया, असं म्हणत विरोधी खासदारांना प्रत्युत्तर दिलं.
प्रश्नोत्तराचा तास सुरु असताना पंतप्रधान १२ वाजून १० मिनीटांनी राज्यसभेमध्ये आले, त्यावेळी ही घोषणाबाजी सुरु झाली. जवळपास १५ मिनीटं मोदी राज्यसभेमध्ये होते. काल मोदींनी लोकसभेमध्ये हजेरी लावली तेव्हाही भाजप खासदारांनी जय श्रीराम आणि मोदी मोदी अशा घोषणा दिल्या होत्या.