'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे दहशतवाद्यांना पाणी पाजणाऱ्यांचा पगार जाणून घ्या...

भारतानं केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली... पण, आपला जीव पणाला लावून या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचा पगार किती आहे? याची तुम्हाला कल्पना आहे? असं काय मिळतं या सेनेला आणि सेनापतींना ज्यामुळे ते दिवस अन् रात्र देशाच्या सुरक्षेसाठी अर्पण करतात...?

Updated: Oct 6, 2016, 07:32 PM IST
'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे दहशतवाद्यांना पाणी पाजणाऱ्यांचा पगार जाणून घ्या...  title=

नवी दिल्ली : भारतानं केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली... पण, आपला जीव पणाला लावून या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचा पगार किती आहे? याची तुम्हाला कल्पना आहे? असं काय मिळतं या सेनेला आणि सेनापतींना ज्यामुळे ते दिवस अन् रात्र देशाच्या सुरक्षेसाठी अर्पण करतात...?


अजित डोवाल, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

अजित डोवाल, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

पाकयुक्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चे मास्टरमाईंड अजित डोवाल... त्यांनी याआधीही अशा अनेक ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावलीय. अजित डोवाल यांचा पगार प्रती महिना १ लाख ६२ हजार ५०० रुपये आहे.


दलबीर सिंह सुहाग, भारतीय सेना प्रमुख

दलबीर सिंह सुहाग, भारतीय सेना प्रमुख

दलबीर सिंह सुहाग यांनी सर्जिकल स्ट्राईकला यशस्वीरित्या पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय सेना प्रमुखांचा महिन्याचा पगार आहे २ लाख ५० हजार रुपये...


लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह, DGMO

लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह, डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन (DGMO)

मीडियासमोर येऊन पहिल्यांदाच भारतीय सैन्याची 'सर्जिकल स्ट्राईक'ची माहिती देणारे लेफ्टनंट जनरल रणबीर सिंहांचा चेहरा एव्हाना अनेकांना माहिती झालाय. त्यांचा महिन्याचा पगार आहे १ लाख ९० हजार रुपये...


पॅरा ट्रूप कमांडो

पॅरा ट्रूप कमांडो

खुद्द पाकिस्तानव्याप्त काश्मीर भागात घुसून... आपले प्राण पणाला लावून... पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना पाणी पाजणाऱ्या पॅरा ट्रूप कमांडोजचा पगार ऐकून कदाचित तुम्हाला धक्काही बसू शकतो... सेनेच्या या धडाकेबाज कमांडोजचा महिन्याचा पगार आहे अवघे ३० हजार रुपये...


मनोहर पर्रिकर, संरक्षणमंत्री

मनोहर पर्रिकर, संरक्षणमंत्री

संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना मात्र इतर खासदारांप्रमाणेच पगार मिळतो. यामध्ये ५२ हजार रुपये बेसिक पगारासहित इतर भत्ते मिळून त्यांचा मासिक पगार असतो १ लाख ९० हजार रुपये....