भोपाळ : मध्यप्रदेशच्या टीकमगड जिल्ह्यात एक प्रेमी जोडप्याची गोळ्या मारून हत्या झाल्याची घटना घडलीय. हॉरर किलिंगची ही घटना असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येतंय.
उल्लेखनीय म्हणजे, मृत तरुणीचं गुरुवारी लग्न होणार होतं... पण त्याआधीच तिची आणि तिच्या प्रियकराची गोळ्या घालून क्रूर हत्या करण्यात आलीय. गुरुवारी सकाळी तरुण आणि तरुणीची प्रेतं शेतात सापडली.
मृत तरुण आणि तरुणी हे दोघे चुलत भाऊ - बहिण होतं. संबंधित तरुण गांजा बाळगल्याप्रकरणी काही दिवस अटकेतही होता. दोन दिवसांपूर्वीच त्याची सुटका झाली होती. त्यानंतर तरुण आणि तरुणी बुधवारी रात्रीपासून गायब होते.
दरम्यान, मृत तरुणीचे आणखीही एका तरुणाबरोबर संबंध असल्याचं सांगितलं जातंय. पोलीस मात्र या घटनेकडे 'हॉरर किलिंग'च्या दृष्टीने पाहत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.