सांगड्यासोबत राहणाऱ्या प्रकरणाला वेगळं वळण...

कोलकत्यातील सांगड्यांसोबत राहणाऱ्या व्यक्तीच्या प्रकरणाने एक वेगळे वळण घेतले आहे. सायको भाऊ पार्थ डे याचे त्याची मोठी बहिण देबजानी डे हिच्याशी शारीरिक संबंध असल्याचा आशय पार्थ याने आपल्या डायरीत लिहून ठेवली आहे. ही डायरी पोलिसांच्या हाती लागली असून त्यातील काही वाक्यांचा अर्थ त्या दिशेने जात असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. 

Updated: Jun 12, 2015, 08:48 PM IST
सांगड्यासोबत राहणाऱ्या प्रकरणाला वेगळं वळण... title=

कोलकाता : कोलकत्यातील सांगड्यांसोबत राहणाऱ्या व्यक्तीच्या प्रकरणाने एक वेगळे वळण घेतले आहे. सायको भाऊ पार्थ डे याचे त्याची मोठी बहिण देबजानी डे हिच्याशी शारीरिक संबंध असल्याचा आशय पार्थ याने आपल्या डायरीत लिहून ठेवली आहे. ही डायरी पोलिसांच्या हाती लागली असून त्यातील काही वाक्यांचा अर्थ त्या दिशेने जात असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. 

पार्थ डे यांचे त्यांच्या मोठ्या बहिणीशी शारीरिक संबंध असल्याची माहिती तिच्या आईला झाली होती.  तिला हे संबंध मान्य नव्हते. 

पार्थ डे आपल्या डायरी लिहितो की, जशजशी माझी बहिण आकर्षक होऊ लागली होती, माझी आई तिचा द्वेष करत होती.  आम्ही एकदा फिरायला गेलो होतो तेव्हा आईने कपडे काढले होते. 

आईला वाटत होते की मी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. त्यामुळे माझ्यामध्ये सेक्सची भावना उत्पन्न व्हावी म्हणून घरात मोलकरीण ठेवली होती. पण मी शारीरिकदृष्ट्या सक्षम होतो आणि आई चुकीची होती. 

पार्थ डे यांची पोलिसांनी मेडिकल टेस्ट केली. त्यावेळी मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे चित्र डॉक्टरांना दिसले. तसेच लैंगिक मानसिकतेतून तो घरात राहत होता आणि त्याची अशी परिस्थिती झाली असल्याचे डॉक्टरांनी निष्कर्ष काढला. त्यांनी डॉक्टरांनाही कपडे काढण्यासाठी सांगितले होते. 

प्रकरणं कसे आले समोर
घरात आग लागल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याच घटनेच्या चौकशी दरम्यान शहर पोलिसांना मात्र जबरदस्त धक्का बसला.  कारण, याच घरात मृत पावलेल्या व्यक्तीचा मुलगा मोठी बहिण आणि दोन पाळीव कुत्र्यांच्या मृत पावलेल्या, कुजलेल्या शरीरासोबत आढळला. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या सहा महिन्यांपासून हा व्यक्ती याच अवस्थेत या घरात राहत होता. 

कोलकाता शहरातील रॉबिन्सन स्ट्रीटच्या तीन क्रमांकाच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. याच घटनेची चौकशी पोलीस करत होते. बुधवारी रात्री एका बाथरूममध्ये घराचा ७७ वर्षीय मालक अरविंदो डे यांचं जळालेल्या अवस्थेत शव आढळलं होतं. 

विशेष अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) पल्लव कांती घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याच्या घटनेनंतर गुरुवारी रात्र डे यांच्या फ्लॅटच्या बाहेर दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात केले. यानंतर, डे यांचा मलगा पाथ डे (४५ वर्ष) यानं पोलिसांना पाहून विचित्र पद्धतीनं वागणं सुरू केलं. पहिल्यांदा वडिलांच्या मृत्यूचा धक्का बसल्यानं पाथ डे  असं करतोय, असं पोलिसांना वाटलं. पण, जेव्हा त्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली तेव्हा त्यानं आपल्या घरात आपली मोठ्या बहिणीचं मृत शरीर तसंच कुत्र्यांचीही उरलेले हाडं घरात असल्याचं सांगितलं.

यानंतर, पोलिसांनी घरात शोधाशोध केल्यानंतर त्यांना एका रुममधून पाथ डेच्या मोठ्या बहिणीचा - देवजानी (५०) हिचं आणि दोन पाळीव कुत्र्यांचं मृत शरीर सापडलं. तसंच, दुसऱ्या एका रुममधून कथित रुपात पाथ डेच्या पित्यानं लिहून ठेवलेली सुसाईड नोटही पोलिसांच्या हाती लागलीय.  आठ जून अशी तारीख लिहिलेल्या या सुसाईड नोटमध्ये पार्थ डेच्या वडिलांनी आपल्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असं लिहिलंय. 

पार्थ डे याच्या म्हणण्यानुसार, देवजानी हिनं गेल्या वर्षी आपल्या दोन लाडक्या कुत्र्यांच्या मृत्यूनंतर खाणं-पिणं सोडून दिलं होतं. सहा महिन्यांपूर्वी तिचाही मृत्यू झाला. 

पोलिसांनी पार्थ डेला मनोरुग्णालयात दाखल केलंय. घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही... तसंच कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. तीनही मृत शरीरांच्या अवशेषांना फॉरेन्सिक चौकशीसाठी धाडण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.