नवी दिल्ली : साध्वी निरंजन ज्योतींबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत स्पष्टीकरण दिलं. हे प्रकऱण आता संपायलसा हवं. त्याचप्रमाणे याप्रकरणी साध्वी निरंजन ज्योतींनी माफी मागितली आहे. त्यांना मी समजही दिल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय.
साध्वी निरंजनांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी सलग तीन दिवस संसदेचं कामकाज ठप्प केलं. आज लोकसभेत पंतप्रधानांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करूनही विरोधकांनी आक्रमक भूमिका कायम ठेवल्याने, अखेर सत्ताधा-यांनाच विरोधकांविरोधात संसदेच्या आवारात धरणं आंदोलन करावं लागलं.
भाजपच्या खासदार साध्वी निरंजन यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन काँग्रेसनं आक्रमकता कायम ठेवलीये. दिल्लीत आज राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. काळी पट्टी लावून काँग्रेसनं निषेध केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.