जम्मूत दहशतवाद्यांबरोबर चकमक, ८जवान ३ पोलीस शहीद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी बारामुल्ला जिल्ह्याच्या उरी सेक्टरमध्ये लष्कराच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ११ जवान शहीद झालेत. तसेच सोपिया येथील पोलिस दलाला आपले लक्ष्य केले आहे. 

PTI | Updated: Dec 5, 2014, 06:53 PM IST
जम्मूत दहशतवाद्यांबरोबर चकमक, ८जवान ३ पोलीस शहीद title=

जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी बारामुल्ला जिल्ह्याच्या उरी सेक्टरमध्ये लष्कराच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ११ जवान शहीद झालेत. तसेच सोपिया येथील पोलिस दलाला आपले लक्ष्य केले आहे. 

लष्कराच्या छावणीला लक्ष्य केल्याने या हल्ल्यात शहीद झालेल्यामध्ये एक लेफ्टनंट कर्नलही सामील आहे. तर सोपिया येथे झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक कमांडर मारला गेला. तर दक्षिण काश्मीरातील पुलवामामधील एका गर्दीच्या बस स्टॅंडवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला, यात एक व्यक्ती ठार झाला. तर सहा जण जखमी झाले. 

जम्मू काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. पहिल्या दोन टप्प्यात मतदारांनी चांगला प्रतिसाद देत विक्रमी मतदान केले. मतदारांमध्ये भीती निर्माण करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जम्मू दौरा आहे. त्याआधी हा हल्ला करण्यात आल्याने चिंता व्यक्त होत आहे.

जम्मू काश्मीरला नऊ डिसेंबर रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यापूर्वी शुक्रवारी पहाटे तीन वाजून दहा मिनिटांनी मोठ्या शस्त्रसाठ्या सह दहशतवाद्यांनी हल्ला केला यात भारतीय सेनेच्या आठ जवान आणि तीन पोलिस शहीद झाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.