सावधान... कशा ओळखाल नकली नोटा!

सीमेपलिकडून भारतात दाखल होणाऱ्या नकली नोटांचा धंदा फोफावतोय. पण, हाच काळा पैसा आपल्या घामाच्या कमाईलाही पायदळी तुडवताना दिसतोय. नकली नोटांबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं आपल्या नियमांत बदल करून आणखी कडक केले आहेत. या नोटांची भारतातील एन्ट्रीच बंद व्हावी, यासाठीही सध्या प्रयत्न सुरु आहेत. पण, यामध्ये सर्वात गरजेचं आहे ते नागरिकांनी जागरुक राहणं...

Updated: Oct 28, 2014, 08:36 AM IST
सावधान... कशा ओळखाल नकली नोटा! title=

मुंबई : सीमेपलिकडून भारतात दाखल होणाऱ्या नकली नोटांचा धंदा फोफावतोय. पण, हाच काळा पैसा आपल्या घामाच्या कमाईलाही पायदळी तुडवताना दिसतोय. नकली नोटांबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं आपल्या नियमांत बदल करून आणखी कडक केले आहेत. या नोटांची भारतातील एन्ट्रीच बंद व्हावी, यासाठीही सध्या प्रयत्न सुरु आहेत. पण, यामध्ये सर्वात गरजेचं आहे ते नागरिकांनी जागरुक राहणं...

खोट्या नोटांबाबतीत आरबीआयनं सगळ्या बँकांना काही आदेश दिलेत. यात, जर एखाद्या बँकेकडे नकली नोट आली तर त्यावर रिजेक्टेड असं लिहिलं जावं त्यामुळे ती नोट पुन्हा बाजारात पुढे ढकलली जाणार नाही, असेही आदेश देण्यात आलेत. अशा वेळी आपलं नुकसान होऊ नये, यासाठी तुम्ही सावधानता बाळगणं गरजेचं आहे... यासाठी महत्त्वाचे आहे ते नकली नोटा ओळखता येणं...  

कशा ओळखाल नकली नोटा

- बहुतेकदा: नोटाच्या कागदावरून नोट खरी आहे की खोटी हे ओळखता येऊ शकेल.

- बहुतेकदा नकली नोटा K00, BH00 या सीरिजमध्ये असतात. 

- नोटा ओळखण्यासाठी उजेडात धरा...

- उजेडात पाहिल्यानंतर, खऱ्या नोटांवर रिकाम्या जागेवर गांधीजींचा फोटो तुम्ही स्पष्टपणे पाहू शकाल. जो लाईट आणि शेड दोन्हींमध्ये दिसतो. 

- नोटाच्या उजव्या बाजुला गांधीजींच्या फोटोच्या खाली असलेल्या गोल चिन्हात आरबीआयचा सील असतो. जो एम्बेड (ठळ्ळक) केलेल्या स्वरुपात असतो. 

- नोटाच्या रिकाम्या जागेवर वॉटर मार्क दिसतो. 

- पाचशेच्या नोटांवर एक गोल निशाण, एक हजाराच्या नोटांवर हिऱ्याचं निशाण, शंभराच्या नोटांवर त्रिकोण तर पन्नासच्या नोटांवर चौकोनी निशाण दिसतं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.